दवबिंदू आणि विविध थेंब

Spiritual Wisdom By Dr. Surekha S. Bhalerao Published: December 2025

डोळ्यातील अश्रूंच्या थेंबांना , वास्तवतेचे भान नसते

तोंडाला सुटलेल्या पाण्याला चवीची जाण असते!

कपाळावरच्या घर्मबिंदूना, कष्टांची आण असते

करंज्याच्या तुषारांच्या थेंबांमध्ये, आनंदाची खाण असते!


बाष्पीभवनातून जमलेल्या थेंबांना, ढग बनण्याचे ज्ञान असते

पहिल्या पावसाच्या थेंबांना, तृषा शमवण्याचा मान असतो!


एक एक करून साठणाऱ्या थेंबांना, तळे बनण्याचे ध्यान असते

पानांवरून ओघळणाऱ्या दवबिंदूंच्या थेंबांना, उष:काळाचे वरदान असते!