तुझ्यातला सूर्य

Spiritual Wisdom By Dr. Surekha S. Bhalerao Published: December 2025

तुझ्यातला सूर्य जराही ढळू देऊ नकोस रे

मनातल्या मळभा चा ढीग साठू देऊ नकोस रे


वेदनांच्या गर्तेत फसून जाऊ नकोस रे

विचारांच्या आवर्तनात हरवून जाऊ नकोस रे

अंधार जरी चोहीकडे तरी हिम्मत हरू नकोस रे

चंद्र चांदण्यातही सूर्याचाच त्या प्रकाश रे

त्यांच्या सोबतीने धर सूर्योदयाची आस रे

ढळू दे मळभाचे ढग अन जाऊ दे बरसून त्यांना

लक्ख प्रकाशात तुझ्यातल्या इंद्रधनूला आव्हान दे

मनातील आशा जराही मिटू देऊ नकोस रे

तुझ्यातला सूर्य जराही ढळू देऊ नकोस रे

तुझ्यातला सूर्य जराही ढळू देऊ नकोस रे