उत्पत्ती स्थिती आणि लयीचे आवर्तन
हवे हवेसे तरी कधी जाचक वाटणारे हे बंधन
निसर्ग तर पार पाडत असतो हे चक्र सातत्याने अविरत
प्रत्येक क्षण त्याला देतो साथ, हरेक ऋतू त्याच्या वाचनात
नभातील असंख्य ग्रह तारे देखील, नाही त्यास अपवाद
नित्य पौर्णिमेला घेऊन येतो चंद्रमा, शुभ्र चांदणी रात!
वृक्ष वेली देखील न चूकता, आपापली लावतात हजेरी
फुले उमलणे फळांनी बहरणे पानगळ होते ठरल्या वेळी
पशू पक्ष्यांचे स्वरबद्ध कालबद्ध मिळणारे संकेत
जणू स्थळ काळ वेळेचे गुपित त्यांना असे न्यात
मग माणसांचे घड्याळ या तालासंगे आहे का मिळते जुळते
का माणूसपणाची सवलत घेऊन स्वतःच्या मर्जीने ते पळते?