मळ्यात मळ्यात: मनाचा मोकळेपणा

Spiritual Wisdom By Dr. Surekha S. Bhalerao Published: December 2025

चेहऱ्यावर हसू अन आवंढा गळ्यात चालणार नाही

अहो सुख पण भरभरून घेता यायला पाहिजे

अन दाद पण समरसून देता यायला पाहिजे

तालावर मनमुराद नाचत यायला पाहिजे

स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेता यायला पाहिजे

एखाद्या विनोदावर खळखळून हसता यायला पाहिजे

शोकाकुल झाल्यास ढसाढसा रडता यायला पाहिजे

नरो वा कुंजरवा हरघडी करत, कुढत बसले तर चालणार नाही चालणार नाही !